Ad will apear here
Next
महाकालीचा 'शीडम' - Tetrameles nudiflora R. Br. (Tetramelaceae)
1

रत्नागिरीपासून २० किमी अंतरावर दक्षिणेस हरचिरी नावाचे एक गाव आहे. वरच्या हरचिरीतील जुन्या महाकाली मंदिराजवळ असलेला हा महाकाय शीडम वृक्ष अर्थात Tetrameles nudiflora R. Br. (Tetramelaceae). रस्त्याच्या डाव्या बाजूस खाली घळणीवर उभा आहे. वरून जाणाऱ्याच्या नवख्या माणसास ‘नजरबंदी’ करून खाली बोलावून गाठ-भेट केल्याशिवाय जाऊ देत नाही हा. तीनशे-साडे तीनशे वर्षांतील चांगली वाईट वादळे भरून राहिलीत याच्यात.

हरचिरीचे ग्रामस्थ सांगतात की साधारण १५ वर्षांपूर्वीपर्यंत या शीडमावर एक दीड मीटर लांबीची किमान २० ते २५ मधमाशांची पोळी लटकलेली दिसायची. आंबा बागायातींच्या परागीकरणात त्यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता. आता एकही नाही. त्याच कारण आम्ही ना-लायक. आंब्यांवर ८ काय आणि १० काय, किटकनाशकांच्या फवारण्या केल्याशिवाय आमचं भागत नाही. शेजारच्या बागेत १० झाल्या तर मी १२ करणार आणि पुन्हा शेखी मिरवणार. काही ठिकाणी १५ पर्यंत जातात हे आणि वर आणखी कौतुकाने सांगतात चार लोकांत. म्हणजे आंब्यांना अंघोळच घालतात थोडक्यात. तर अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत शीडमावर आज एकही मधमाशी दिसत नाही.

महाकाली मंदिराचा परिसर आहे आणि ‘देवपाण’ वगैरे असल्याने कदाचित हा शीडम राहिला असावा. कारण देवळाच्या या वरच्या परिसरात केवळ हा एकाच वृक्ष शिल्लक आहे, बाकी सगळ चकाचक साफ. मला मात्र त्याचीही भविष्यात शाश्वती वाटत नाही. कारण वेळ पडल्यास देवाचाच कौल घेऊन देवराईत झाड तोडायची परमिशन मागणारे आम्ही ‘देवाचे लाडके’ आणि तो ती देणारा, हे ही ‘नसे थोडके’.

- मिलिंद पाटील

2
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BXUBCO
Similar Posts
‘भिकेडोंगरी’चो भेळो डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे.
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br. कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं
रोपांना आधार देताना... वृक्षांची बियांपासून केलेली रोपे झरझर वाढतात. खालील एका फोटोत आमच्या बागेत लावलेले फणसाचे एक रोप आहे जे १ वर्षात ९ फूट उंच वाढले आहे. अशा उंच रोपांना आधार देण्याची गरज असते अन्यथा मोठ्या वाऱ्यात अशी झाडे वाकडी होतात किंवा मोडतात देखील आणि अशा वाकड्या झाडांकडे दुर्लक्ष केल्यास ती तशीच वाकडी होऊन वाढू लागतात
सुरंगीचो वळेसार... लहान नाजूक पाकळ्यांची सुगंधी फुले बऱ्याचदा स्त्रीलिंगी तर काहीशी मोठी फुले पुल्लिंगी संबोधली जातात उदा. जाई, जुई, अबोली वगैरे किंवा चाफा, तगर, गुलाब वगैरे. यात अनेक अपवादही आहेत. सुरंगी अर्थात Mammea suriga (Buch.-Ham. Ex Roxb.) Kosterm. (Family: Calophyllaceae) या प्रजातीत कित्येकदा नर आणि मादी झाडे वेगळी वेगळी असतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language